FDI World Dental Congress 2027 · Mumbai

21–24 October 2027 · Jio World Convention Centre

परिचय

डॉ. विश्वास पुराणिक

दंतवैद्य, कायदेतज्ज्ञ आणि संस्थाशिल्पी. पन्नास वर्षे डोंबिवलीच्या आणि दंतवैद्यक क्षेत्राच्या सेवेत. इंडियन डेंटल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष (२०१७) आणि एफडीआय जागतिक दंत परिषद २०२७, मुंबईच्या स्वागत समितीचे अध्यक्ष.

Dr. Vishwas Puranik in a traditional kurta and topi

१९७६

डोंबिवलीत व्यवसायाचा प्रारंभ

२०१७

राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन

२,८५५+

वैद्यकीय मदत निधीतून मदत मिळालेले रुग्ण

१५०+

दंतवैद्यक आणि कायदा विषयावर व्याख्याने

मुंबई · २१–२४ ऑक्टोबर २०२७

मुंबईत जगाचं स्वागत

एफडीआय जागतिक दंत परिषद २१ ते २४ ऑक्टोबर २०२७ दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होत आहे. इंडियन डेंटल असोसिएशन या परिषदेचे सह-यजमान आहे. भारतात ही परिषद तिसऱ्यांदा होत आहे. स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. पुराणिक जगभरातील प्रतिनिधींचे स्वागत करतील.

—दिवस बाकी
The Indian delegation at the FDI General Assembly, Prague, September 2026
प्राग, सप्टेंबर २०२६: एफडीआय सर्वसाधारण सभेत भारताचे प्रतिनिधी मंडळ

कहाणी

पन्नास वर्षांचा प्रवास

कोकणातून मुंबईत

कोकणाशी नाळ जोडलेले डॉ. पुराणिक यांनी रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि १९७५ मध्ये मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालयातून बी.डी.एस. पदवी मिळवली.

डोंबिवली, १९७६

१९७६ मध्ये त्यांनी डोंबिवली पश्चिमेत दंतवैद्यकीय व्यवसाय सुरू केला. १९९९ मध्ये ते डोंबिवलीतील पहिले इम्प्लांट करणारे दंतवैद्य ठरले.

कायद्याचे शिक्षण

वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी एलएल.बी. पदवी आणि नंतर वैद्यकीय-कायदेविषयक पदव्युत्तर पदविका मिळवली. दंतवैद्यकातील कायदेविषयक प्रश्नांवर त्यांनी सुमारे १५० व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी वर्षभर ‘दंत-पुराण’ हे साप्ताहिक सदर लिहिले.

इंडियन डेंटल असोसिएशन

१९८४ मध्ये डोंबिवली शाखेचे संस्थापक खजिनदार, १९९६–९७ मध्ये महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष आणि २०१७ मध्ये संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष. अध्यक्षपदासाठी त्यांच्याविरोधात कोणीही उभे राहिले नाही.

वैद्यकीय मदत निधी

२००१ मध्ये त्यांनी वैद्यकीय मदत निधी ट्रस्टची स्थापना केली. गरजू रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत देणाऱ्या या ट्रस्टने आतापर्यंत २,८५५ हून अधिक रुग्णांना मदत केली आहे.

डोंबिवली आणि कोकण

डोंबिवली जिमखान्याचे अध्यक्ष, फुणगूस येथील श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे माजी संचालक.

सन्मान

पुरस्कार

  • डोंबिवली धन्वंतरी (२००२) — हा पुरस्कार मिळवणारे पहिले दंतवैद्य
  • देवरुखे भूषण (२०१०)
  • जीवनगौरव पुरस्कार, आयडीए डोंबिवली शाखा (२०१४)
  • आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार

विश्वास या संकल्पनेचं चालतं-बोलतं प्रतीक म्हणजे डॉ. विश्वास पुराणिक.

श्रीराम शिधये

संपर्क

व्याख्याने, कार्यक्रम आणि एफडीआय २०२७ संबंधी संपर्कासाठी: drvishwasp@gmail.com